पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले तर ते बाद होणार आहेत.
solapur
पोलिस भरतीSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलात ९० तर शहरात ७९ आणि कारागृह शिपायांची सुमारे १५ अशी एकूण १८४ पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले तर ते बाद होणार आहेत.

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना दहावी-बारावीचे गुणपत्रक, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), एमएससीआयटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर (ज्यांना गरजेचे आहे त्या उमेदवारांसाठी) आणि पोलिस पाल्य, भूकंपग्रस्त, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एनसीसी, अनाथ आरक्षणानुसार अर्ज करणाऱ्यांकडे त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. दरम्यान, चालक शिपायासाठी पुरुष उमेदवारास १६०० मीटर धावणे, गोळाफेक आणि महिला उमेदवारास ८०० मीटर धावणे व गोळाफेक असे दोनच भाग असतील). पण, त्यांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी बंधनकारक आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज करताना ४५० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५० रुपयांचे शुल्क भरावे लागते.

दरम्यान, एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात उमेदवारांना अर्ज करता येणार नाही, असा निकष आहे. पोलिस शिपाई असो किंवा अन्य कोणत्याही एका पदासाठी उमेदवारास राज्यभरात सगळीकडे अर्ज करता येणार नाहीत. त्या उमेदवाराने एका पदासाठी अनेक अर्ज केले, तर त्याचा एकच अर्ज ठेवून बाकीचे अर्ज बाद ठरविले जाणार आहेत. मात्र, वेगवेगळ्या पदासाठी उमेदवार स्वतंत्र अर्ज करू शकतो.

शारीरिक चाचणी अशी...

  • पुरुष महिला गुण

  • १०० मीटर धावणे ८०० मीटर धावणे २०

  • १०० मीटर धावणे १०० मीटर धावणे १५

  • गोळाफेक गोळाफेक १५

लेखी चाचणी अशी...

मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण घ्यावे लागतात. त्यातून एका पदासाठी १० उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होते. लेखी परीक्षेसाठी अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न असतात. या परीक्षेत किमान ५० टक्के गुण बंधनकारक असतात. लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ असतो. विशेष बाब म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com