मुंबई - माझ्यावर पोलीस पाळत ठेवत आहेत. मुंबईतील नाना चौकातील सर्वोदय आश्रमात माझा मुक्काम असतो, त्या आश्रमात पोलीस सातत्याने पाळत ठेवत आहेत. आज सकाळी साध्या वेशातील पोलिसाने थेट बेडरूममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे तिसऱ्यांदा घडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.