पोलिस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 18 July 2020

राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.

मुंबई - राज्यातील पोलिसांच्या १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ!

राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी दहा हजार जणांची पोलिस भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police will complete the recruitment process by December