Maharashtra Politics : लोटांगण अन् ‘डस्टबिन’; एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दावे-प्रतिदावे

औरंगजेबाची कबर आणि नागपूर दंगलीचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले.
uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shindesakal
Updated on

मुंबई - औरंगजेबाची कबर आणि नागपूर दंगलीचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घातले, असा गौप्यस्फोट केला.

या आरोपाला उत्तर देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘होय तेव्हा शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या ‘डस्टबिन’मध्ये होते. आम्हाला कळलेच नाही,’ असे उपरोधिक उत्तर सभागृहाबाहेर बोलताना दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या विधानाचा उल्लेख करत छळ कसा असतो तो त्यांना माहिती आहे का? असा सवाल केला. त्यांचे कोणी डोळे काढले का? नखं काढली का ? असा सवाल सपकाळ यांचा उल्लेख न करता केला.

विरोधी पक्षात बसलेले अनिल परब यांच्याकडे पाहत शिंदे म्हणाले, तुमचा पण छळ झाला का असा प्रश्न केला. त्यावर अनिल परब यांनी, माझा छळ कसा झाला हे तुम्हाला माहिती आहे असे सांगत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांवर प्रहार केले.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर या चौघांना तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र केले होते. म्हणून आम्ही मंत्रिपदावर लाथ मारली. महाविकास आघाडी सरकारचा टांगा पलटी केला आणि महायुतीचे सरकार आणले, असे शिंदे म्हणाले.

ते म्हणाले की, सत्तेसाठी ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि औरंगजेबी विचार स्वीकारले आणि काँग्रेससोबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात, अशी टीका शिंदे यांनी केली.

ते म्हणाले, औरंगजेबाचे विचार स्वीकारल्याने तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. भाजप आणि आमची विचारधारा हिंदुत्वाची असल्याने आम्ही एक आहोत. दिल्लीत जाऊन मला वाचवा, राज्यात युती सरकार स्थापन करू असे सांगून आलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्यात आल्यावर पलटी मारली असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव टाळत केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,

  • नागपूरची घटना अतिशय दुर्दैवी

  • एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते

  • औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन करणार नाही

  • पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांचा हिशोब केला जाईल

  • घटनेमध्ये ३३ पोलीस जखमी, तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ५ नागरिकही गंभीर जखमी

  • पोलिसांकडून कसून चौकशी

  • असामाजिक तत्वांवर कडक कारवाई करण्याचे सरकारची भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com