
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेवरून शुक्रवारी विधानसभेत आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले. या योजनेतील प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. तर हा दावा सिद्ध करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांना दिले.