esakal | महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात नेमंक काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

Political Drama in Maharashtra Politics

आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात नेमंक काय घडलं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

-  शरद पवार यांनी घेतली संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात भेट

-लीलावती रुग्णालयात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे आशिष शेलार कॉंग्रेसचे भाई जगताप यांच्यासह असंख्य नेत्यांची रिघ

 - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दिवसभर खलबते

- सायंकाळी कॉंग्रेसचे नेते मल्लिाकार्जून खर्गे, अहमद पटेल, के. सी. वेनूगोपाल यांचे दिल्लीतून मुंबईत आगमन

 - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा

 - सत्तास्थापनेसाठी दोन दिवसांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यपालांना पत्र

 - याच पत्राच्या आधारे राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची केंद्राला शिफारस

 - राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

 - राज्यपालांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

 - मालाड येथे हॉटेल रिट्रीट येथे शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांची खलबते

loading image