मुंबई - पक्षाच्या कार्यालयातून राज्य महिला आयोगाचे काम चालत असल्याचा आक्षेप मुख्य निवडणूक आयोगाने दोनवेळा घेतल्यानंतरही आयोगाच्या कामासाठी पक्षाच्या कार्यालयाचा वापर थांबविण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील धायरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाचा जनता दरबार भरविला जात असल्याने त्यावर आक्षेप घेतला जात आहे.