लग्नसोहळे 'हॉटस्पॉट' तर सर्वपक्षीय नेते मंडळी 'सुपर स्प्रेडर'

लोकांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या नेत्यांना कोरोनाचा विसर?
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilTeam eSakal

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Covid19) आणि ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची वाढती संख्या पाहता तिसरी लाट (Third Wave of Covid19) आली असल्याचं मत आरोग्य क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच निर्बंध लावले होते. मास्क वापरा, लसीकरण करा, गर्दीत जाणं टाळा असं आवाहन वारंवार सत्ताधारी पक्षांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केलं जातंय. कार्यक्रमांना गर्दी केल्यावरून अनेक सर्व सामान्य नागरिकांवर कारवाई देखील झाली आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या सभा आणि कुटुंबातील व्यक्तींचे लग्न समारंभ मोठ्या उत्साहात सुरू आहेत. मंगळवारी माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा लग्न समारंभ पुण्यात पार पडला. हा लग्न समारंभ आता कोरोनाचं हॉटस्पॉट (Covid19 Hotspot) ठरल्याचं दिसतंय.

Harshvardhan Patil
राज्यात ओमिक्रॉनचे १९८ तर कोरोनाचे ५३६८ नवे रुग्ण

हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव यांचे निहार ठाकरे यांच्याशी विवाह पार पडला. मुलगा आणि मुलगी दोघांनाही मोठा राजकीय वारसा असल्यानं या विवाह सोहळ्याला गर्दी होणार हे निश्चित होतं. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना गर्दी न करण्याचं, मास्क वापरण्याचं आवाहन करणारी सर्वपक्षीय नेतेमंडळी या लग्नात विनामास्क वावरत होती. याच लग्नात उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वत: हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेकजण कोरोनाबाधित झाले आहेत.

या विवाह सोहळ्यासह राज्यात गेल्या काही दिवसांत चार विवाह सोहळे पार पडले. यामध्ये अहमदनगरचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलांच्या लग्न सोहळ्यात देखील अशीच गर्दी पाहायला मिळाली. याच गर्दीत उपस्थित असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे या लग्नात त्यांच्या शेजारी विनामास्क बसलेल्या देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन हे सुद्धा कोरोनाबाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Harshvardhan Patil
हर्षवर्धन पाटलांना कोरोनाची लागण; मंगळवारी मुलीच्या लग्नात दिग्गजांची उपस्थिती

नाशिकचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाच्या लग्नात, नाशिक जिल्हा परीषदेचे अध्यक्ष क्षीरसागर यांच्या मुलीच्या लग्नातही सारखीच परिस्थिती होती. अशाच वेगवेळ्या कार्यक्रमांत उपस्थित असणाऱ्या वर्षा गायकवाड, प्राजक्ता तणपुरे, माधूरी मिसाळ, के.सी. पाडवी यांच्यासह कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे आता हे विवाह सोहळे म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट आणि राजकीय मंडळी सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं दिसतं आहे.

Harshvardhan Patil
Omicron : राज्यात कठोर निर्बंध लागू, जाणून घ्या नियमावली

दरम्यान, मुंबईसह राज्यात कोरोनाच्या (Covid19) वाढत्या रुग्णांनी चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात कोरोनाचे 3671 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, जे एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा सुमारे 46 टक्क्यांनी जास्त आहेत. मुंबईत सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 11360 आहे. मुंबईत आतापर्यंत 16375 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 रुग्ण आढळले. गेल्या 24 तासात राज्यात 22 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com