कांदेंकडून भुजबळांवर ताणलेली बंदूक शिवसेना की राष्ट्रवादीची?

suhas kande chhagan bhujbal
suhas kande chhagan bhujbalesakal

नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (shivsena mla suahas kande) यांच्यातील निधी वाटपावरून झालेला वाद चिघळला अन् राजकिय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली. काल (ता.३० सप्टेंबर) आमदार कांदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात शिवसेनेची वजनदार मंडळी म्हणजेच महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, गट नेते विलास शिंदे हे नेते हजर होते. त्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भुजबळ यांचीही पत्रकार परिषद झाली. दोन्ही पत्रकार परिषदांतील फरक म्हणजे कांदे जरी नवखे असले तरी त्यांच्या समवेत ही स्थानिक वजनदार मंडळी होती. भुजबळ प्रभावी असले तरी त्यांच्या समवेत सामान्य मंडळीच दिसली. त्यामुळे एकीकडे सेना पाठीशी असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी गेली कुठे? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे

कांदे यांच्या खांद्यावर ही बंदूक कोणी ठेवली असेल?

शिवसेनेत पक्षाचा आदेश असल्याशिवाय पानही हालत नाही. ही मंडळी संजय राऊत (sanjay raut) यांना विचारल्याशिवाय डोळ्याच्या पापणीची उघड झापही करीत नाही, त्यातील काहींना कंठ फुटला होता. हा वेगळाच संदेश आहे. त्यावर कांदे यांची प्रतिक्रीया होती, `ही तर सुरुवात आहे`पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shivsena MLA Suhas Kande) यांनी मोठी राजकीय मोहीम (Political Drive against Bhujbal) उघडली आहे. त्यांचे पालकमंत्री पद काढा (Remove him as Guardian Minister) यापर्यंत ती गेल्याने आश्चर्य वाटणारच. भुजबळांसारख्या जेष्ठ या राजकीय नेत्यावर गंभीर आरोप लावण्यासाठी कांदे यांच्या खांद्यावर ही बंदूक कोणी ठेवली असेल? हा गंभीर राजकीय प्रश्न आहे.

नांदगाव मतदार संघात पुरेसा निधी मिळाला नाही आणि पालकमंत्री भुजबळ पक्षापात करतात असा आरोप करीत आमदार सुहास कांदे यांनी पंधरवाड्यातच त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तो मिटला. त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल करून त्यांना पालकमंत्री पदावरून दूर करावे अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदे या दोन लोकप्रतिनिधींमधील वाद दिसत होता.

suhas kande chhagan bhujbal
भुजबळ 'भाई युनिव्हर्सिटी'चे प्राचार्य : सुहास कांदे;पाहा व्हिडिओ

एक कांदे येतात व भुजबळांना हैराण करतात

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ओबीसींचे नेतृत्व करत असून त्यांचा राजकीय दबदबा पाहता त्यांच्या विरोधात 'ब्र' शब्द काढण्याची हिंमत नसते. जिल्ह्यातील (कै) डॉ वसंत पवारांसह अनेक पात्र नेत्यांना केवळ भुजबळ यांची मर्जी नसल्याने राजकीय त्रास झाला होता. तर केवळ भुजबळ यांची मर्जी म्हणून जयंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे अशा अनेकांना पदांची लॅाटरी लागलेली जिल्ह्याने पाहिले. हे राजकारण तेव्हाही कोणाला पसंत नव्हते. मात्र कोणाचे काही चालले नाही. आज शिवसेनेतील एक कांदे येतात व भुजबळांना हैराण करतात, हे त्यामुळेच सहज पचनी पडणारे नाही.

suhas kande chhagan bhujbal
भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची गंभीर दखल

माझे त्यांच्याशी मतभेद नाहीत

राजकारणात तेही महाआघाडीतील दोन नेत्यांत असे घडते तेव्हा ती धोक्याची घंटा मानली जाते. भुजबळ आणि कांदे यांच्यात प्रदिर्घ काळ वाद सुरु होताच. त्याला राजकीय वाद म्हणावा असा तो नव्हता. तो वाद वेगळाच होता. अगदी पंकज भुजबळ यांचा पराभव झाला तरी टोकाचे मतभेद कधीच नव्हते. भुजबळ यांनी ठाकरे कुटुंबियांसोबतचे मतभेद संपुष्टात आणले, ते भुजबळ आमदार कांदे यांच्याशी तुटे पर्यंत ताणतील ही शक्यता फारच कमी. तसे भुजबळ यांनी यापूर्वी व काल देखील हे प्रकरण संपले. माझे त्यांच्याशी मतभेद नाहीत, असे जाहीर करून टाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com