esakal | भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स, चौकशीला गती; पो.आ.पांडेंची गंभीर दखल
sakal

बोलून बातमी शोधा

भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची 
गंभीर दखल

भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची गंभीर दखल

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : आमदार सुहास कांदे (mla suhas kande) यांनी पोलिसांकडे त्यांना आलेल्या धमकीबाबत तक्रार केली आहे. त्याची सखोल चौकशी सुरू झाली आहे. लवकरच यात आमदार कांदे तसेच दूरध्वनी केल्याची तक्रार असलेल्या अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांना समन्स पाठवून दोघांचे जबाब घेणार आहेत.

पोलिस आयुक्त पांडे : आरोप-प्रत्यारोपामुळे चौकशीला गती

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. आमदार कांदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर ही याचिका मागे घ्यावी म्हणून धमकीचा फोन आल्याची तक्रार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडे दिली आहे. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापू लागल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गंभीर दखल घेत चौकशीला गती दिली आहे.

हेही वाचा: भुजबळ 'भाई युनिव्हर्सिटी'चे प्राचार्य : सुहास कांदे;पाहा व्हिडिओ

आमदार कांदे, अक्षय निकाळजे यांना समन्स

भुजबळ-कांदे यांच्यातील आरोप- प्रत्यारोपाच्या फैरीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला गती दिली आहे. पुढील आठवड्यात यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याचे दिसेल, अशी शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यत कांदे व त्यांना दूरध्वनीवर धमकी दिल्याची तक्रार असलेल्या निकाळजे यांचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी घोटी टोल नाका परिसरात झालेल्या वादाचे सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे. तसेच कॉल डिटेल्स मिळविले जात आहे. तक्रारीच्या अनुषंगाने दोघांना समन्स पाठवून जबाब नोंदविण्यासाठी बोलावले जाणार आहे. पुढील आठवड्याच्या सुरवातीला ही कार्यवाही सुरु होईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

loading image
go to top