Nana Patole : दहा लाख घेऊन पेपर फोडला; पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचा पटोलेंचा सरकारवर आरोप

Nana Patole
Nana Patoleesakal

डोंबिवली - कर्नाटकमध्ये सरकार आलं. आता सर्व राज्यांमधून भाजपच्या सत्ता लोकं काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे 14 आणि 19 ची कथा कुणी सांगायची गरज नाही. पाचोळा कोणाचा होणार आहे, हे देशातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे घाई करू नका मुख्यमंत्री महोदय.. निवडणुका लावा, म्हणजे कळेल तुम्हाला असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Nana Patole
Mumbai : सोशल मीडियावर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधाने; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान राबविण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली मधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गुरुवारी डोंबिवलीत आले होते. यावेळी संतोष केणे, सचिन पोटे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2019 च्या लाटे मध्ये विरोधक पालापाचोळ्या सारखे उडून गेले असे विधान केले होते त्या विधानाला उत्तर देताना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना घाई न करण्याचा सल्ला देत सांगितले, इंदिराजींच्या लाटेमध्ये अनेक विरोधक त्या काळात उडून गेले आहेत आणि अनेक वर्ष उडत गेले. हे फक्त दहा वर्षाच्या कालावधीत आता लोकांना कळायला लागलेलं आहे की या घोषणा, फेकूगिरी, खोटे स्वप्न दाखवून लोकांचं पोट भरलं जात नाही. लोकांना लुटलं जातं आणि देशांमध्ये जे फक्त घोषणा करून सत्तेत आलेले आहेत, स्वप्न दाखवून आलेले आहेत, त्यांच्यामुळे लोकांचं स्वप्नभंग झालेलं आहे. आता कर्नाटकमध्ये सरकार आलं. आता सर्व राज्यांमधून भाजपच्या सत्ता लोकं काढणार हे निश्चित आहे. त्यामुळे 14 आणि 19 ची कथा कुणी सांगायची गरज नाही.

Nana Patole
महानिर्मितीचा चौथा संच लवकरच कार्यन्वित होणार; राज्याच्या क्षमतेत पडणार ६६० मेगावॅटची भर

डबल इंजिन म्हणजे काय ?

मणिपूरमध्ये डबल इंजिन सांगताहेत, पण डबल इंजिनचा अर्थ काय असतो? एक इंजिन नापास झालं की दुसरं इंजिन लावावं लागतं आणि त्याला ढकलावं लागतं. मणिपूरमध्ये काय केलं डबल इंजिनचा सरकारने? तिथे आदिवासींना मारलं जातं, जाळपोळ केली जाते, ख्रिश्चनांच्या चर्च जाळल्या जातात. ही देशातली व्यवस्था नाही. देशांमध्ये सर्वधर्मसमभावाची संविधानाने दिलेली जी शिकवण आहे, त्याचं पालन केले पाहिजे. सत्तेत राहून दुसऱ्या धर्माला मारायचं आणि तिसरा धर्माला जिवंत ठेवायचं.

महाराष्ट्रात आल्यावर गाय आई आणि गोव्यात गेल्यावर गाय खाई, अशा पद्धतीची प्रवृत्ती नकली हिंदुत्वाची भाजपची आहे. ती लोकांना आता लक्षात आलेली आहे. त्यामुळे पाचोळा कोणाचा होणार आहे, हे देशातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे घाई करू नका मुख्यमंत्री महोदय.. निवडणुका लावा, म्हणजे कळेल तुम्हाला असे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? यावर बोलताना पटोले म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच मनात तसं नाही, तर जनतेच्या मनात सुद्धा तसं आहे आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड घेते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे आणि कार्यकर्त्यांना ही माझी विनंती आहे आधी तुमच्या भागातले आमदार निवडून आणा. त्यासाठी लोकांमध्ये जा आणि जास्तीत जास्त आमदार आपापल्या भागातून निवडून आणा, मग काँग्रेसचे मुख्यमंत्री होणारच..

नंतर मुख्यमंत्रीपदावरून वाद होणार नाहीत ना? सगळ्याच पक्षामध्ये चाललेलं आहे. काही लोक स्वतःच म्हणतात की मी पुन्हा येईल, त्यामुळे आमच्यात तसं नाहीये. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतो.

चित्त्यांचा मृत्यू होतोय.

देशाचा प्रधानमंत्री यांना बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे, लोक उपाशी मरतायत, महागाई वाढत चालली आहे, हे प्रश्न असताना बाहेरच्या देशातून चित्ते आणायचे हा शौक कुठले प्रधानमंत्री पाळत आहेत? आता तो एक एक चित्ता मरतोय. इतका खर्च करून जनतेचे पैसे खर्च करून चित्ते आणले आहेत. त्याची काळजी सरकारला आहे. पण इथे लोक उपाशी मरतायेत, बेरोजगारीने मरतायेत, त्याची चिंता देशाचे प्रधानमंत्री करत नाहीत. हा शौकच आहे. जनतेचा पैसा आणि सत्तेचा दुरुपयोग आहे.

केजरीवाल राहुल गांधी यांना भेटणार..

देशात आज संविधानिक व्यवस्थेचे तीन तेरा वाजवण्याचे काम सुरू झालं आहे. नवीन संसद इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं होतं. पण प्रधानमंत्री स्वतः उद्घाटन करणार आहेत. विटा सिमेंट आणि लोखंडाने बनलेल्या संसद इमारतीत खऱ्या अर्थाने संसदीय मूल्य जोपासले गेले पाहिजे. ते सुद्धा राज्यकर्त्यांना कळत नसेल? राष्ट्रपती या लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रमुख असतात. सरकारने घेतलेल्या निर्णयांना मान्यता राष्ट्रपती देत असतात. इतकं मोठं हे राष्ट्रपती पद आहे. तरीही आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपती पदाची अवहेलना आणि त्या पदाचा अवमान करण्याचं काम प्रधानमंत्र्यांकडून केलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीविरोधात देशातल्या सगळ्या लोकांनी आणि राजकीय पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका काँग्रेसची आहे आणि त्यासाठी सोनिया गांधी यांच्या आदेशाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समन्वयक केलेलं आहे आणि सगळ्या राज्यस्तरीय पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नंतरही काँग्रेसची भूमिका कायम राहील का की एकला चलो रे होईल?

- राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालं तर सगळे पक्ष उद्घाटनाला जाणार. आपल्या देशात लोकशाहीला मजबूत ठेवण्याचे काम हे संविधानाने केलं आहे आणि संविधानामध्ये अधिकार ज्याचे त्याला दिले आहे. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. संविधानाला संपवण्याचे काम होत असेल तर ज्यांना याबाबत काळजी आहे त्यांनी याचा विरोध केला आहे.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये नाहीत. उद्धव ठाकरेंसोबत त्यांची युती झाली आहे, असं ते सांगतात. त्यामुळे त्यांनी काय बोलावं, काय नाही, यावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही.

मुंबईतील पोलिस भरतीत घोटाळा झाला आहे. ७ हजार जागा होत्या. भरतीसाठी ८४ हजार तरुण-तरुणी आल्या होत्या. मात्र दहा लाख रुपयांत पेपर फोडला. ज्यांनी पैसे दिले ते पास आणि ज्यांनी नाही दिले ते नापास, असा आरोप पटोले यांनी केला. तसेच सरकार 1000 कोटी प्रचारासाठी आणि प्रसिद्धी साठी खर्च करत आहेत. इकडे लोक रडत आहेत आणि हे हसत आहे. एक दाढीवाला आणि एक बिना मिशीवाला असं म्हणत, नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com