raj thackeray and uddhav thackeray
sakal
मुंबई - ‘एकेकाळी भाजपचे धोरण राष्ट्रहित प्रथम असे होते, तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आता ‘भ्रष्टाचार प्रथम’ असे त्यांचे धोरण झाले आहे. भाजपने मुंबईत हवेचेच नाही, तर भ्रष्टाचाराचेही प्रदूषण केले आहे,’ असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. तसेच, भाजपला समाजामध्ये फूट पाडून राज्य करायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.