
युपीएससीने बडतर्फ केलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. यानंतर तिने तिच्यावर झालेल्या आरोपांबाबत मौन सोडलं आहे. आपल्याविरोधात नरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि त्याला नकारात्मक पुरावे जोडण्यात आल्याचा आरोप तिनं केलाय. दिव्यांग प्रमाणपत्र, ओबीसी आरक्षण, वेगवेगळ्या नावाने परीक्षा देणं, प्रशिक्षणावेळी मिळालेले मेमो याबाबत पूजा खेडकरने सविस्तर मुलाखत दिलीय. मला माझं पद पुन्हा बहाल होईल याची खात्री आहे आणि मी पुन्हा आयएएस होईन असा विश्वास पूजा खेडकर यांनी व्यक्त केला.