
solapur crime
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडने दीड वर्षातच गोविंद बर्गे यास कंगाल केले होते, असा नातेवाइकांचा आरोप आहे. १५ सप्टेंबरला (सोमवारी) पूजाचा वाढदिवस होता. गिफ्ट म्हणून तिने गोविंदचा राहाता पाच कोटींचा बंगलाच मागितला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
सासुरे येथील पूजा गायकवाड काही वर्षांपासून बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करीत आहे. दीड वर्षापूर्वी तिची ओळख लुखामसला (ता. गेवराई, जि. बीड) गावचे माजी उपसरपंच गोविंदसोबत झाली. सारखे येण्याने गोविंदची पूजासोबत ओळख झाली, त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघेही एकमेकांना रात्रंदिवस बोलू लागले. प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या गोविंदकडे बक्कळ पैसा होता हे पूजाने हेरले होते. वाढलेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गोविंदचा तिच्यावर जीव जडल्याने तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता. याचाच फायदा घेऊन पूजाने त्याच्याकडून दागिने, पैसे, बुलेट, महागडा मोबाईल, स्थावर मालमत्ता घेतली होती. घरच्यांच्या विरोधात जाऊन गोविंद सारे करीत होता. आता तिने गोविंदचा गावातील बंगलाच मागितला होता, पण गावातील बंगला दिल्यावर बदनामी होईल म्हणून त्याने नकार दिला होता. गोविंद तिला दुसरा बंगला घेऊन द्यायला तयार होता, पण पूजाचा हट्ट त्याच बंगल्यासाठी होता.
गोविंद तिला भेटण्यासाठी आतुर होता, पण पूजा भेटत नव्हती. आत्महत्येच्या दिवशीदेखील ती पारगावच्या कला केंद्रातच होती, पण त्या दिवशी गोविंदला ती तेथे नसल्याचे सांगितल्याने तो तिच्या सासुरे गावी आला होता. आता पोलिस तपासावेळी मी कला केंद्रातच होते, असे तिने सांगितले आहे. त्यामुळे खरोखर ती तेथेच होती का? याच्या पडताळणीसाठी वैराग पोलिस तिचा सीडीआर (कॉल डिटेल्स) व लोकेशन मागविले आहे. सध्या ती पोलिस कोठडीत असून तिला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बॅंक खात्याचे डिटेल्स मागविले
पूजाने गोविंदकडून दीड वर्षात किती रक्कम घेतली, गोविंदच्या आणि पूजाच्या बॅंक खात्याचे व्यवहार वैराग पोलिसांनी मागविले आहेत. त्यातून दोघांमधील आर्थिक व्यवहाराची माहिती समोर येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोविंदसोबत आपले संबंध होते, पण त्याच्या आत्महत्येमागे आपला काहीही संबंध नसल्याचे तिने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे.
बंदुकीच्या तपासासाठी मागविले ‘सीडीआर’
७ सप्टेंबरला पूजाला भेटायला आलेल्या गोविंदला त्यावेळी ती भेटली नव्हती. कुटुंबाच्या विरोधात जाऊन पूजाला मागेल ते देऊनही तिने बोलणे-भेटणे बंद केल्याने तो नैराश्यात होता. त्यानंतर गोविंदने बंदुकीतील गोळी झाडून आत्महत्या केली. पण, परवाना नसतानाही गोविंदकडे बंदूक आली कोठून, याचा शोध पोलिस घेत आहेत. ‘सीडीआर’मधून ही बाब समोर येईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.