
मुंबई : ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार करण्यात आलेल्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री करण्यास कोणतीही बंदी नसेल,’ अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) सोमवारी (ता. ९) उच्च न्यायालयामध्ये दिली. यासंदर्भात अभ्यासासाठी नियुक्त समितीच्या अहवाला आधारे ‘सीपीसीबी’ने न्यायालयाला ही माहिती दिली; परंतु नैसर्गिक जलाशयात पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.