esakal | शेतकऱ्यांना दिलासा; पीकविमा भरण्यास मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

akola washim Pradhan Mantri Pik Bima Yojana

पीकविमा भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केला नव्हता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांना दिलासा; पीकविमा भरण्यास मुदतवाढ

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- पीकविमा भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केला नव्हता. तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, यासंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवत पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. राज्याचा हा प्रस्ताव केंद्राने मंजुर केला असून पीकविमा भरण्यात 23 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (pradhan mantri fasal bima yojana extended 23 july crop insurance dada bhuse)

राज्यातील अधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुर झाला असून योजनेत सहभागासाठी 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी 15 जुलैला पीकविमा भरण्याची मुदत संपणार होती.

हेही वाचा: कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

इच्छा असुनही अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पिकविमा भरता आला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास पीकविम्याची मुदत वाढवण्यास केंद्र सरकारची तयारी असल्याचं म्हणाले होते. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास पिकविमा भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात येईल, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले असल्याचं दानवे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवला होता.

हेही वाचा: Corona: देशात दिवसभरात 38 हजार 949 नवे रुग्ण; 542 जणांचा मृत्यू

राज्यातील जवळपास 20 टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. सर्वच जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे. असे असताना शेतकरी याबाबत फारसे उत्साही दिसले नाहीत. शिवाय अर्ज करणाऱ्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली असल्याने पेरण्या अजून झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छा असताना शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही.

loading image