esakal | कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

Results

कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहणार?

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

हेही वाचा: SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

कसा पाहाल निकाल ?

-निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर जावं.

-त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

-आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

-Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

-तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

- निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

loading image