पहिल्या प्रसुतीनंतर आईला मिळतात पाच हजार रुपये... या योजनेचा तुम्ही लाभ घेतलाय का...नसेल तर असा मिळवा

सुस्मिता वडतिले
Friday, 10 July 2020

केंद्र सरकारने शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिला वगळता बाकी गोरगरिब महिला या योजनेसाठी पात्र आहेत. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना सुरू करण्यात येते. या योजनेत नावनोंदणी केल्यास मातांना पहिल्या प्रसुतीवेळेस पाच हजार रुपये मिळतात.

देशात आर्थिक परिस्थित विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजूरी करुन जगत आहे. आजही काही घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करत आहेत. या दिवसात महिलेला गर्भधारणेच्या अवस्थेत काम करताना अडचणी येत असल्यामुळे ती महिला काम करु शकत नाही. त्यामुळे तिच्या परिवारातील आर्थिक स्थिती खालावत जाते. अशा परिस्थितीत या परिवाराला मदत मिळावी. तसेच बाळाच्या जन्म आणि बालसंगोपनाला हातभार लागावा. याकरिता ही योजना पूर्वी ‘इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना’ या नावाने सुरु करण्यात आली होती. पुढे या योजनेत बदल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या महिलांना ही योजना लागू आहेत. 

केंद्र सरकारने शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री मातृवंदना योजना १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली आहे. केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिला वगळता बाकी गोरगरिब महिला या योजनेसाठी पात्र आहेत. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना सुरू करण्यात येते. या योजनेत नावनोंदणी केल्यास मातांना पहिल्या प्रसुतीवेळेस पाच हजार रुपये मिळतात. 

भारतामध्ये दर तीन स्त्रियांमध्ये एक स्त्री कुपोषित असते. कुपोषणामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची असतात. बालकाचे कुपोषण मातेच्या गर्भाशयातच सुरू होते. याचा अनिष्ट परिणाम एकूणच त्यांच्या जीवन चक्रावर होतो. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून आर्थिक व सामाजिक ताण तणाव कमी केलं जातं.

काही महिला गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत घरची कामे करीत असतात. बाळ जन्मानंतर त्या लगेच कामाला लागतात. अशावेळी त्यांच्या शरीराची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे शारीरिक क्षमता पूर्वपदावर येण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या स्त्रियांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमुळे सर्वसामान्य परिस्थितीतील गरोदर माता व बालकांना हक्काचे आरोग्यदायक लाभ मिळत आहे.

योजनेचा मुख्य उद्देश...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश मातेच्या प्रसुतीच्या अगोदर व प्रसुतीनंतर पहिल्या बाळाकरिता मातेला विश्रांती मिळावी आणि बुडीत मजुरीचा लाभ व्हावा हा आहे. आर्थिक मोबदला दिल्यामुळे गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्य सेवांचा लाभ घेण्याकडे कल वाढला आहे. 

हे घेवू शकतात या योजनेचा लाभ...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनेचे लाभार्थी होवू शकतात. या योजनेंतर्गत सरकारने पाच हजार रुपयांची तरतूद केली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील आरोग्य सेविकांकडे माहिती मिळू शकेल. 

अशी करा नोंदणी...

-  या योजनेत नोंदणी करण्यासाठी मातांना अंगणवाडीमध्ये जावून फॉर्ममधील माहिती वाचून भरून देणे.
-  तीनही फॉर्म भरून झाल्यानंतर अंगणवाडीतील कर्मचारी एक स्लीप देतील.
- अशाप्रकारे तुमची नावनोंदणी पूर्ण होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pradhan Mantri Matruvandana Yojana provides Rs. 5000 to the mother after the first delivery