राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून येणार? I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून येणार?

कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून येणार?

राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी पहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान आता भाजपचे उमेदवार संजय केणेकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

गेली काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी ही निवड बिनविरोधी व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितले होते. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलेल्या विनंतीनंतर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता प्रज्ञा सातव विधान परिषदेसाठी बाजी मारु शकणार का? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रज्ञा सातव विधान परिषेदवर बिनविरोधा जाव्या यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीला यश आले का ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फे रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती. त्यानंतर भाजप उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या लग्नाचा निकाहनामा समोर, मलिकांचा बॉंम्ब

loading image
go to top