प्रफुल्ल पटेल म्हणाले, विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही

Praful Patel said, not a big blow
Praful Patel said, not a big blowPraful Patel said, not a big blow

नागपूर : आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. मात्र, आम्हाला अपक्षांचे चार ते पाच मिळाले नाही. तसेच एक मत अवैध ठरवले गेले. आमचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही. या सर्वांचा विचार केला तर फार मोठा फटका बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (National congress party) प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली. (Praful Patel said, not a big blow)

नागपुरात आल्यावर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले. अपक्ष आणि आमच्यासोबत असलेल्या लहान पक्षांनी महाविकास आघाडीलाच (maha vikas aghadi) मतदान केले. महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत फुटले नाही. काही लोकांची वेगळी प्रवृत्ती असू शकते. त्याच्या खोलात जावे लागेल, असेही प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले.

Praful Patel said, not a big blow
‘मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत एकच नेता; तो म्हणजे देवेंद्र फडणवीस’

आमच्या पक्षाकडे ५१ मत होते. त्यांनी ठरल्यानुसारच मतदान केले. मात्र, एक मत आम्हाला जास्त मिळाले. कोणी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने ते दिले. ठरल्यानुसार काही मत संजय पवारांना दिले होते. तीन पक्षाच्या सरकारमध्ये (maha vikas aghadi) मतभेद होऊ शकतात. ते एका पक्षाच्या सरकारमध्येही होते. नागपुरात काय सुरू आहे, सर्वांना माहिती आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

आम्ही सर्व गोष्टींचा विचार करू. कुठे काय झाले. आम्हाला अपक्षांची चार ते पाच मत का मिळाली नाही. तीन ते चार दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. घाई करण्याची गरज नाही, असेही प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com