मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर सुनावणीला हजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारी हजेरी लावली.

मुंबई - मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारी हजेरी लावली. या खटल्याची सुनावणी नियमितपणे सुरू आहे. आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी न्यायालयात सुनावणीला हजेरी लावावी, असे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. एस. पडळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रज्ञासिंह ठाकूर गुरुवारी सुनावणीला उपस्थित होत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जाण्याची परवानगी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न्यायालयाच्या आदेशांनुसार सुनावणीला हजर राहू, असे त्यांनी नंतर न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले. मालेगाव बाँबस्फोट खटल्याच्या कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. या कामकाजाबाबत दोन सीलबंद अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबत न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragyan Singh Thakur attends hearing on Malegaon bomb blast