साखर कारखान्यावरील ईडी कारवाईनंतर तनपुरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prajakt tanpure
साखर कारखान्यावरील ईडी कारवाईनंतर तनपुरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

साखर कारखान्यावरील ईडी कारवाईनंतर तनपुरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : दोन दिवसांपूर्वी ईडीनं (ED) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांच्या राम गणेश गडकरी या साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली होती. यानंतर तनपुरे यांनी आज पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Prajakta Tanpure first reaction after ED action on his sugar factory)

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्यावर ईडीची कारवाई; कॉंग्रेस नेत्यालासुद्धा फटका

"हे प्रकरणी अत्यंत नियमात धरून व्यवहार केले गेले. याची जाहिरात दिली गेली त्यानुसार, टेंडर भरलं गेलं. त्यानंतर बंद पडलेला कारखाना सुरू करण्यात आला. यातून कामगारांना न्याय मिळाला. याप्रकरणी ईडीनं माझी चौकशी केली, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर दिली. पण मला कोर्टात न्याय मिळेल. चौकशीत यापुढे काही निष्पन्न होणार नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावरही ही बाब घालण्यात आली आहे," असं तनपुरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Aryan Khan Case : 'एनसीबी'कडून खंडणीखोरी सुरु होती हे आता स्पष्ट; काँग्रेसचा हल्लाबोल

दरम्यान, ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे. एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. तनपुरेंच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे.

Web Title: Prajakta Tanpure First Reaction After Ed Action On His Sugar Factory

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..