Prakash Ambedkar Prediction: महापालिका निवडणुकीचं मतदान संपण्याआधीच प्रकाश आंबेडकरांचं निकालाबाबत मोठं भाकीत, म्हणाले..

Prakash Ambedkar’s Statement : अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला, यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना भाकीत केलं आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

esakal

Updated on

Prakash Ambedkar Prediction about Municipal Election Result : राज्यभरात आज २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रांवर विविध कारणांमुळे गोंधळही पाहायला मिळाला आहे. बोटवरील शाई पुसली जात असल्याचं म्हणत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका सुरू केली आहे. शिवाय, बोगस मतदानही होत असल्याचा आरोप केला आहे. 

एकीकडे मतदानाबाबत राज्यभरात या सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मतदान प्रक्रिया संपण्याआधीच महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत एक भाकीत केलं आहे. ज्याच्या सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील या निवडणुकी निर्णायक ठरतील. तसेच, या निवडणुका मागील दहा वर्षांचे भाजपचे वर्चस्व समाप्त करतील. अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला, यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)सह कोणत्याही महानगरपालिकेत कोणताही पक्ष पूर्ण सत्ता मिळवू शकणार नाही.

Prakash Ambedkar
voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

याशिवाय प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी या वर्षीच्या नागरी निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ही निवडणूक निर्णायक ठरेल आणि गेल्या दहा वर्षांचे भाजपचे वर्चस्व संपवेल." ते म्हणाले की भाजपला एकपक्षीय व्यवस्था हवी आहे, परंतु ही निवडणूक त्याविरुद्ध आहे कारण जनतेला बहुपक्षीय व्यवस्था हवी आहे.

Prakash Ambedkar
Zilla Parishad election district: निवडणूक जाहीर झालेल्या १२ जिल्हा परिषदा नेमक्या कोणत्या? जाणून घ्या, एका क्लिकवर

प्रकाश आंबेडकरांनी असा दावा केला की, बीएमसीसह कोणत्याही महानगरपालिकेत कोणताही एक पक्ष पूर्ण सत्ता मिळवू शकणार नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसशी युती केली आहे. तसेच, "निवडणुकीदरम्यान पैशांच्या वाटपाच्या घटना घडत आहेत, परंतु मतदार स्वतःच अशा लोकांना दूर करत आहेत, जे लोकशाहीसाठी एक सकारात्मक संकेत आहे." असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com