Prakash Ambedkar: मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MVA

मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...

शिवसेना आणि वंचित बहुजन यांची युती झाल्याची चर्चा होती मात्र अजून पर्यंत अधिकृत जाहीर करण्यात आलं नाही. मात्र याची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा: Prakash Ambedkar: कहानी में ट्विस्ट! वंचित पदवीधर-शिक्षक मतदार संघाच्या चार जागा लढवणार

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्यास वंचित सकारात्मक होती मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

हेही वाचा: Moreshwar Temurde : शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचं निधन; पार्थिवाबाबत कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय!

ते म्हणाले आम्ही दोन्ही पक्षांचे युतीत स्वागत करू" त्यामुळे आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. युतीच्या घोषणेचा चेंडू प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गोटात टोलवला आहे. आगामी काळात महाविकास आघाडीत अजून एका मोठ्या पक्षाचा प्रवेश होणार असल्याचे चित्र समोर आलं आहे.