Moreshwar Temurde : शरद पवारांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेत्याचं निधन; पार्थिवाबाबत कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय!

चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
NCP leader Moreshwar Temurde Passed Away
NCP leader Moreshwar Temurde Passed Awayesakal
Summary

त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता त्यांचं पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबानं घेतला आहे.

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे (Moreshwar Temurde) यांचं 82 व्या वर्षी निधन झालं. वरोरा इथं राहत्या घरी झोपेतच त्यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.

त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता त्यांचं पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबानं घेतला आहे. ‘माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका, माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा’, असा संकल्प टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबानं हा निर्णय घेतला आहे.

NCP leader Moreshwar Temurde Passed Away
चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जात होते. चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वरोरा- भद्रावती विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे.

NCP leader Moreshwar Temurde Passed Away
Devendra Fadnavis : सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा..

आज 82 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com