
पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
आता प्रकाश आंबडेकर यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. भाजपची ही जुनी मानसिकता आहे. ते जे काही बोलले त्यात नवीन काय नाही, त्यांचे तेव्हाचे जे काही जे प्लॅन होते ते आत्ताही त्यांना अमलात आणता येत नाहीत हाच त्यांचा जळफळाट आहे. अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.