Prakash Ambedkar: भिमा कोरेगाव प्रकरणात फडणवीसांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या; प्रकाश आंबेडकरांची मागणी!

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

Devendra Fadnavis: प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर, असा वाद निर्माण झाला आहे.

भिमा कोरेगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या असं मागणी करणार पत्र, प्रकाश आंबेडकर यांनी भिमा कोरेगाव चैकशी समीतीला पाठवलं आहे.

मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांची देखील विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केल आहे.

प्रकाश आंबेडकर यांना ५ जूनला साक्ष तपासण्यासाठी आयोगाने बोलावलं होता. यावेळी पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे येऊ शकत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला कळवलं आहे.

Prakash Ambedkar
Raj Thackeray: महाराष्ट्र कशासाठी जगवलात? राज ठाकरे जेव्हा शिवरायांना फोन कॉल करतात

देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार -

देवेंद्र फडणवीस म्हणाले, याप्रकरणा अनेक लोकांनी अर्ज केले होते. आयोगाने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतला आहे. मुळात या आयोगाची कार्यकक्षा ठरली आहे.

प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. त्यांना हे माहित आहे. आयोगासमोर कुणाला बोलवलं पाहीजे आणि कुणाला नाही. मात्र राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरीता अशाप्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत आहेत.

Prakash Ambedkar
Friends Forever: दोस्तांची जिगरी! 30 वर्षापूर्वीच्या मित्राला भेटण्यासाठी गोव्याचे विधानसभा अध्यक्ष पंढरपूरात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com