परभणीतील जमाव आक्रमक झाला असून जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिस आणि जमाव आमने-सामने आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. परिस्थिती हाताबाहेर गेली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील प्रतिकात्मक संविधानाच्या अवमानाची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. त्या घटनेचे पडसाद आज दुपारपासून शहरात उमटायला सुरुवात झाली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे ट्विट केले आहे.