Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

Maharashtra farmers : अजित पवार यांनी “शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करणार?” असा सवाल करताच वाद निर्माण झाला. प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर टीका करत विचारले — “शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का सरकारला शांत झोप मिळावी म्हणून?”
Prakash Ambedkar addressing a press conference criticizing Deputy CM Ajit Pawar’s remarks on farmer loan waivers, demanding justice for Maharashtra’s struggling farmers.

Prakash Ambedkar addressing a press conference criticizing Deputy CM Ajit Pawar’s remarks on farmer loan waivers, demanding justice for Maharashtra’s struggling farmers.

esakal

Updated on

Summary

  1. अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि कमी भावामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

  2. मदत जाहीर झाली तरी ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, असा आरोप आंबेडकरांनी केला.

  3. वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी किती काळ करत राहणार असा सवाल केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तुमचे सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही. शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? असा स्पष्ट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com