प्रणिती शिंदे अन्‌ धैर्यशिल मोहिते पाटलांना ‘या’ तालुक्यांनी बनविले खासदार! पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी सत्ताधारी आमदारांच्या बालेकिल्ल्यातून खेचले मताधिक्य

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या नवख्या उमदेवारांनी मोठ्या फरकाने सत्ताधारी भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा या विजयातून काढला तर धैर्यशिल मोहिते पाटलांनी आपल्या कुटुंबाची ताकद काय, हे भाजपला दाखवून दिले.
sakal
loksabhasolapur

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या नवख्या उमदेवारांनी मोठ्या फरकाने सत्ताधारी भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव केला. आमदार प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा या विजयातून काढला तर धैर्यशिल मोहिते पाटलांनी आपल्या कुटुंबाची ताकद काय, हे भाजपला दाखवून दिले. धैर्यशिल यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ७० हजारांहून अधिक लिड आहे, पण प्रणिती शिंदेंना त्यांच्या ‘शहर मध्य’ मतदारसंघात एक हजारांपेक्षाही कमी लिड मिळाला. धैर्यशिल यांना सांगोल्यात मताधिक्य मिळाले नाही, पण शिंदे बंधुंच्या माढा व करमाळा या दोन्ही मतदारसंघातून त्यांनी ९४ हजारांचे मताधिक्य घेतले. प्रणिती शिंदेंना मोहोळ व पंढरपूर- मंगळवेढा या दोन्ही मतदारसंघानी विजयी केल्याची स्थिती निकालातून स्पष्ट झाली. इतरही मतदारसंघात त्यांना चांगली मते मिळाली.

(सोलापूर) मतदारसंघनिहाय मतदान

  • विधानसभा प्रणिती शिंदे राम सातपुते

  • मोहोळ १,२८,२८९ ६५,१३७

  • शहर उत्तर ७१,४५४ १,०७,३८१

  • शहर मध्य ९०,४६८ ८९,६७२

  • अक्कलकोट ९७,९५४ १,०७,२५१

  • दक्षिण सोलापूर १,०५,४७४ ९६,०३८

  • पंढरपूर-मंगळवेढा १,२४,७११ ७९,२९१

  • पोस्टल १८७५ १२५८

  • एकूण ६,२०,२२५ ५,४६,०२८

------------------

  • निकालाची वैशिष्ट्य

  • प्रणिती शिंदेंच्या विजयात मोहोळचा वाटा सिंहाचा, एकाच मतदारसंघातून ६३ हजार १५२ मताधिक्य

  • शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे राम सातपुतेंना ३५ हजार ९२७ मतांचा लिड

  • आमदार प्रणिती शिंदे यांना स्वत:च्याच विधानसभा मतदारसंघात (शहर मध्य) केवळ ७९६ मतांचे मताधिक्य

  • दक्षिण सोलापुरातून प्रणिती शिंदेंना नऊ हजार ४३६ मतांचा लिड

  • अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांना नऊ हजार २९७ मताधिक्य

  • पंढरपूर- मंगळवेढ्यातून (४५,४२०) आमदार प्रणिती शिंदेंना मोहोळनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य

(माढा) मतदारसंघनिहाय मतदान

  • विधानसभा धैर्यशिल मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर

  • करमाळा ९७,४६९ ५५,९५८

  • माढा १,२२,५७० ७०,०५५

  • सांगोला ८४,५५६ ८९,०३८

  • माळशिरस १,३४,२७९ ६४,१४५

  • फलटण ९३,६३३ १,१०,५६१

  • माण ८६,०५९ १,०९,४१४

  • पोस्टल ३६४७ २२०५

  • एकूण ६,२२,२१३ ५,०१,३७६

---------

  • ठळक वैशिष्ट्य

  • करमाळ्यातून धैर्यशिल मोहिते पाटलांना ४१ हजार ५११ मतांचा लिड

  • माढा विधानसभेतही धैर्यशिल मोहिते पाटलांची बाजी, ५२ हजार ५१५ मतांचे मताधिक्य

  • सांगोल्यात धैर्यशिल मोहिते पाटील पिछाडीवर, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना ४४८२ मताधिक्य

  • माळशिरसच्या बालेकिल्ल्यात धैर्यशिल मोहिते पाटलांना ७० हजार १३४ चा लिड

  • माणमध्ये २३ हजार ३५५ तर फलटणमध्ये १६ हजार ९२८ मतांचे रणजितसिंहांना मताधिक्य

  • रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करीत धैर्यशिल मोहिते पाटलांनी एक लाख २० हजार ८३७ मतांनी मिळवला विजय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com