
Praniti Shinde: कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेनी पोरकटपणा म्हणत केली टीका!
काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. "कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो" असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना चांगलेच सुनावले आहे.(Praniti Shinde Rohit Pawar Congress NCP solapur election)
कांही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असं विधान केले होते. आता रोहित पवारांच्या या विधानाचा प्रणिती शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
"कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल" असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत उत्तर दिलं.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयाचा, या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिना, दोन महिन्यात होईल, असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची, हेदेखील त्याच बैठकीत ठरेल, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
त्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध रंगले आहे. आता यात आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिलं आहे.