Prashant KoratkarSakal
महाराष्ट्र बातम्या
Prashant Koratkar : कोरटकरला तीन दिवसांची कोठडी
Police Custody : तेलंगणमधून ताब्यात घेतलेला प्रशांत कोरटकर आज कोल्हापूर न्यायालयात हजर झाला, जिथे त्याला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : तेलंगणमधून सोमवारी ताब्यात घेतलेल्या प्रशांत कोरटकरला आज सकाळी अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.