

Kolhapur Court: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरुन ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करणाऱ्या प्रशांत कोरटकरला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोल्हापूर कोर्टाने त्याला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. त्यानंतर सरकारी पक्षाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने कोल्हापूर कोर्टाला सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेण्यासंबंधी टिपण्णी केली होती.