

Pratap Sarnaik Instruction for new buses
ESakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात २०२६अखेर आठ हजार नवीन बस दाखल होतील अशा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.