Shivsena News : ठाकरे गटाच्या आमदारांवर होणार अपात्रतेची कारवाई; शिंदे गटाचा थेट इशारा

Pratap Sarnaik sanjay shirsat on uddhav thackeray faction mla whip   eknath sinde faction political news
Pratap Sarnaik sanjay shirsat on uddhav thackeray faction mla whip eknath sinde faction political news Sakal

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण दिला आहे. यानंतर शिंदे गटाकडून विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे. यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जारी केलेल्या व्हिपचे पालन शिवसेनेच्या ५६ आमदारांनी करावं असे शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

शिंदे गटाच्या ४० आमदारांची बैठक आज पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, या बैठकीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा झाली. तसेच या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहा-पानाच्या कार्यक्रमास शिवसेनेच्या ५६ आमदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना प्रतोदांकडून करण्यात आल्या असल्याचे सांगितले. यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचाही समावेश आहे.

शिवसेनेच्या सर्वच्या सर्व ५६ आमदारांना प्रतोद जो व्हिप देतील त्याचे उल्लघंन कोणी करू नये शिवसेनेच्या ५६ आमदारांनी सभागृहामध्ये उपस्थित राहावे असेही सरदेसाई म्हटले आहे.

तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई..

ठाकरे गटाच्या आजच्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आमदारांनी प्रतोदांनी केलेल्या आदेशाचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांनी अधिवेशनात उपस्थित राहावे असे सांगण्यात आले . त्यामुळे आता प्रतोदांचा हा आदेश डावलणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते .

Pratap Sarnaik sanjay shirsat on uddhav thackeray faction mla whip   eknath sinde faction political news
Neelam Gorhe News : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना मातृशोक

राऊतांवर अपात्रतेची कारवाई होणार

निवडणूक आयोगाना अधिकृत पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे. आजच्या बैठकीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यावर देखील चर्चा झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यासंबंधी अपशब्द वापरले त्यावर गुन्हे नोंदवणे सुरू झाले आहे. आठ दिवस थांबा याचं उत्तर त्यांना दिलं जाईल असा इशारा देखील यावेळी शिरसाट यांनी दिला आहे.

आज विधीमंडळ कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आता पक्ष फंड आणि शिवसेना भवन ताब्यात घेणार का याविषयी विचारले असता सिरसाट ते म्हणाले की, पक्ष फंड किंवा शिवसेना भवन बळकवण्यासाठी हे नव्हतं.

आम्हाला या पक्षाचं चिन्ह आणि नाव हे महत्वाचं होतं. या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत झालेल्या निर्णायाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही पक्ष कार्यालयात जाऊन बैठक घेतली.

शिवसेना भवन यावर आम्ही कुठलाही अधिकार सांगणार नाही. ते आमच्यासाठी मंदीर आहे. ते ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार नाही असे संजय शिरसाट यावेळी म्हणाले.

संजय राऊतां २००० कोटींचे आरोप लावले आहेत त्यावर बोलताना शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की हा संजय राऊतांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे.अशा सायको माणसाच्या प्रश्नाला उत्तर देणं उचित वाटत नाही, असेही ते म्हणाले.

Pratap Sarnaik sanjay shirsat on uddhav thackeray faction mla whip   eknath sinde faction political news
Crime News : आयफोन घेऊन आले्ल्या डिलीव्हरी बॉयला संपवलं अन्…; कारण ऐकून व्हाल थक्क

राऊतांवर अपात्रतेची कारवाई होणार

निवडणूक आयोगाना अधिकृत पक्षाची मान्यता आम्हाला दिली आहे. आजच्या बैठकीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यावर देखील चर्चा झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यासंबंधी अपशब्द वापरले त्यावर गुन्हे नोंदवणे सुरू झाले आहे. आठ दिवस थांबा याचं उत्तर त्यांना दिलं जाईल असा इशारा देखील यावेळी शिरसाट यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com