प्रविण दरेकरांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; म्हणाले,मशिदीवरील भोंग्यांबाबत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pravin darekar,  uddhav thackeray

प्रविण दरेकरांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे; म्हणाले...

कोल्हापूर: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत हिंदूत्वाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत विधान केल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. सत्तेसाठी हिंदूत्व बासनात गुंडाळून ठेवलेल्या उद्धव ठाकरे यांनी भोंग्यांबाबतची भूमिका जाहीर करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आज ते कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते.

केवळ सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसैनिकांना पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घ्यावा लागला. तर आता कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा (Congress) झेंडा घ्यावा लागला याचे दुख आहे अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत जी भूमिका मांडली होती तीच आम्ही पुढे नेत आहोत. परंतु सत्तेसाठी हिंदूत्व बासनात गुंडाळून ठेवलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: Pravin Darekar Criticism Uddhav Thackeray Kolhapur Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..