
कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात गुरुवारी (ता. ७) सकाळी तृणमूल काँग्रेस नेते (TMC leader) स्वपन माझी यांची गोळ्या (firing) झाडून हत्या (killed) करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या. त्यांचाही जागीच मृत्यू झाला. सध्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काडतुसे आणि बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. झंटू हलदर आणि भूतनाथ प्रामाणिक अशी अन्य मृतांची नावे आहेत.
गुरुवारी तृणमूल नेते दोन साथीदारांसह घरातून दुचाकीने निघाले होते. काही लोकांनी दुचाकी थांबवून अंदाधुंद गोळीबार (firing) करून पळ काढला. गोळी लागल्याने टीएमसी नेता आणि दोन साथीदार जागीच ठार झाले. स्वपन माझी हे टीएमसीचे नेते असून, स्थानिक पंचायतीचे सदस्यही होते.
मारेकऱ्यांनी प्रथम टीएमसी नेत्यासह तीन जणांना गोळ्या घातल्या आणि नंतर डोके कापण्याचा प्रयत्न केला, असे कॅनिंग पश्चिम येथील टीएमसी आमदार परेश राम दास यांनी सांगितले. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तिघे स्थानिक टीएमसी कार्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
२१ जुलै रोजी दक्षिण २४ परगणामध्ये टीएमसीची रॅली होणार आहे. त्याच्या तयारीसाठीच स्वपन माझी साथीदारांसह बाहेर गेले होते. अज्ञात व्यक्तींनी दुचाकी थांबवली होती. आधी त्यांनी माझी यांना गोळ्या घातल्या आणि नंतर हलदर आणि प्रामाणिक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही गोळ्या घातल्या. हत्या (killed) केल्यानंतर गळा चिरण्याचा प्रयत्न केला, असे स्थानिक लोकांनी सांगितले.
हत्येची व्यक्त केली होती शंका
माझी मंगळवारी रात्री माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझी हत्या (killed) होऊ शकते. मी त्याला गुरुवारी दुपारी येण्यास सांगितले होते. जेणेकरून मला पोलिसांशी बोलता येईल आणि काही सुरक्षा व्यवस्था करता येईल, असे आमदार परेश राम दास यांनी सांगितले.
आरोप-प्रत्यारोप सुरू
आम्ही या प्रकरणी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहो. हा टीएमसीवर हल्ला आहे. भाजपला आमचा पक्ष कमकुवत करायचा आहे. राज्याची प्रतिमा खराब करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. ते हिंसाचाराचा अवलंब करतात आणि नंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याची तक्रार करतात, असे टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, लहान मूलही टीएमसीच्या या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.