कोरोनाची लस कधी येणार..? महसूलमंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येईना मग मी कसं सांगू? 

प्रमोद बोडके
Saturday, 8 August 2020

तालुका व गाव पातळीवर मात्र कोरोना वाढू लागला आहे. कोरोनावर सुरू असलेल्या लसीसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या हाती ही लस कधी मिळणार आणि किती रुपयांना मिळणार, या प्रश्नाचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. सोलापुरातील कोरोना स्थिती व उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री डॉ. यशोमती ठाकूर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी या तिन्ही मंत्र्यांची पत्रकार परिषद आज सात रस्ता येथील नियोजन भवनात झाली. 

सोलापूर : ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्यांची कारणे शोधली असता लग्न, वाढदिवस, अंत्यविधी यासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहिल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण अधिक वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या बाबतीत आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कोरोनाची लस कधी येणार, या प्रश्‍नावर मंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येईना मग मी कसं सांगू? 

हेही वाचा : उपरी येथील तरुणाचा आविष्कार ! तयार केले ऊस भरणी यंत्र 

सुरवातीला मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेला कोरोना नंतरच्या कालावधीत जिल्ह्याच्या ठिकाणी पोचला. मुंबई व सोलापूरसह राज्यातील मोठ्या शहरांमधील कोरोना आटोक्‍यात येत आहे. तालुका व गाव पातळीवर मात्र कोरोना वाढू लागला आहे. कोरोनावर सुरू असलेल्या लसीसंदर्भात विविध प्रसार माध्यमांतून बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या हाती ही लस कधी मिळणार आणि किती रुपयांना मिळणार, या प्रश्नाचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. सोलापुरातील कोरोना स्थिती व उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री डॉ. यशोमती ठाकूर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी या तिन्ही मंत्र्यांची पत्रकार परिषद आज सात रस्ता येथील नियोजन भवनात झाली. कोरोनावरची लस प्रत्यक्षात कधी उपलब्ध होणार? राज्य सरकारची काय तयारी आहे? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर महसूलमंत्री श्री. थोरात यांनी हे उत्तर दिले. 

हेही वाचा : मंगळवेढ्याच्या ऑडिटरचा कोल्हापुरातील रुग्णालयाला झटका! रुग्णाचे अडीच लाखांचे बिल आणले केवळ "इतक्‍या' हजारांवर 

कोरोनाला हरवण्यासाठी किंवा कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जर लसीची वाट पाहात असाल तर तूर्तास तरी आपल्या हातात लस मिळणार नसल्याचे महसूलमंत्री थोरात यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर या तालुक्‍यांत कोरोना बाधितांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनाची परिस्थिती, कारणे याबाबतची माहिती आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचेही महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले. 

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हेच आपल्या हातात 
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्याची कारणे शोधली असता लग्न, वाढदिवस, अंत्यविधी यासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहिल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण अधिक वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या बाबतीत आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press conference of Revenue Minister Balasaheb Thorat to review the Corona