संजय राऊत म्हणताहेत, 'सिकंदरालाही माघार घ्यावी लागली होती!'

Press conference By Shivsena MP Sanjay Raut on BJP Shivsena Alliance
Press conference By Shivsena MP Sanjay Raut on BJP Shivsena Alliance

मुंबई : 'शिवसेनेने ठरवलं तर आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो, सरकारही स्थापन करू शकतो. लिहून घ्या मुख्यमंत्री शिवसनेचाच होणार. महाराष्ट्रच्या जनतेलाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री बघायची इच्छा आहे.' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 1) पत्रकार परिषदेत सांगितले. युती होण्यापूर्वी समसमान फॉर्म्यूला ठरला होता, आता जागावाटपात आणि मुख्यमंत्रीपदाबाबतही समसमान वाटप व्हावे, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे.

महायुतीचे जागावाटपांवरून जमत नसले, तरी तुझं-माझं जमेना अशी अवस्था सेना-भाजपची झाली आहे. अशातच राऊतांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत विचारले असता, पवारांची भेट घेण्यात गैर काय, आमच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. मी त्यांना अधून-मधून भेटत असतो व त्यांचे मार्गदर्शन घेत असतो, असे उत्तर राऊत यांनी दिले. त्यामुळे नक्की महायुतीचे सरकार स्थापन होणार की आणखी नवी राजकीय समीकरणं उदयास येणार हे बाघावे लागेल.

साहिब... मत पालिए, अहंकार को इतना...
महायुतीचे हे वाद शिगेला पोहोचलेले असतानाच आज खा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून खळबल उडवली आहे. 'साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!' असे ट्विट राऊतांनी केले आहे. हे ट्विट कोणत्याही व्यक्तीबाबत नसनू, ज्या गोष्टी मला पटतात त्या मी ट्विटरवर लिहितो असे उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार का, असा सवाल पत्रकारांनी केला असता राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सांगितलंय, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर शिवसेनेचाच होणार, असे सांगितले. पण भाजपकडे बहुमत असले तर त्यांनी आजही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, त्याला आमची हरकत नाही, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com