
MPSC : आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर
MPSC : महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता आयोजित करण्यात येणाऱ्या चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर हे पत्रक उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता चाळणी परीक्षा घेण्यासाठी एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या किती असावी याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती.
याबाबत विचार करून विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि / अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या २६ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास संबंधित जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल.
प्रस्तुत कार्यपध्दतीची अंमलबजावणी सर्व प्रलंबित प्रकरणांसह दिनांक ०१ जानेवारी, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल