Loksabha 2024 : निवडणूक येताच भाजपला आठवला मुस्लिम समाज, 'मिशन २०२४'साठी आखला मास्टर प्लॅन!

Loksabha 2024
Loksabha 2024

भाजपला पुन्हा एकदा केंद्रात सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे भाजप तयारीला लागली आहे. मिशन २०२४ भाजपने हाती घेतली आहे. अल्पसंख्यांकामध्ये भाजपप्रति नाराजी आहे. भाजपला सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश  पुन्हा काबिज करायचे आहे. त्यामुळे भाजपने योग्या पाऊले उलायला सुरूवात केली आहे. देशाच्या लोकसभेत उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त ८० खासदार जातात. त्यामुळे उत्तर प्रदेश जिंकले तर भाजपला बहुमत मिळवायला जास्त कसरत करावी लागत नाही. 

भाजपने लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशात मिशन ८० टार्गेट ठेवले आहे. यासोबत सर्व समाजातील लोकांना जोडण्यासाठी, देश आणि राज्य जोडण्यासाठी 'एक देश एक डीएन' ही संकल्पना भाजप राबवणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व जागा जिंकण्यासाठी आणि अल्पसंख्याकांना त्यांच्याशी जोडण्यासाठी भाजप मुझफ्फरनगरमध्ये कार्यक्रम आयोजित करणार आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व १८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर, पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बसपा आणि सपा यांच्या युतीने ६ जागा जिंकल्या. त्यानंतर नगीना, अमरोहा, बिजनौर आणि सहारनपूर या जागा बसपाच्या खात्यात गेल्या. तर सपाने मुरादाबाद आणि संभल या जागा जिंकल्या. दरम्यान उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांकांमध्ये भाजप बद्दल नाराजी आहे. 

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार भाजप 'एक देश, एक डीएनए' कार्यक्रम मुझफ्फरनगरमध्ये पुढच्या महिन्यात आयोजित करणार आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार उपस्थित राहणार आहेत. 

Loksabha 2024
H3N2 व्हायरसमुळे दोन मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट, जाणून घ्या लक्षणं...

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित अली म्हणाले, पश्चिम उत्तर प्रदेशातील जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक समुदायातील सरासरी २.५ ते ३ लाख लोक आहेत. त्यांच्याकडून भाजप पाठिंबा मागत आहे. प्रामुख्याने शेतीमध्ये गुंतलेल्या या समुदायांमध्ये भाजपचे समर्थक नाहीत. सहारनपुर मध्ये सुमारे १.८ लाख आणि मुझफ्फरनगरमध्ये ८० हजार मुस्लिम राजपूत असल्याचे त्यांनी सांगितले. शामलीमध्ये सुमारे एक लाख मुस्लिम गुज्जर आणि मुझफ्फरनगरमध्ये एक लाख मुस्लिम जाट आहेत.

जाट, राजपूत, गुर्जर आणि त्यागी या समाजीती नागरीकांवर भाजपचे लक्ष्य आगे. या लोकांनी हिंदू नेत्यांना आपले नेते म्हणून स्विकारावे, असे भाजपला वाटते. याबाबत 'एक देश, एक डीएनए' या कार्यक्रमात चर्चा केली जाणार आहे. राजपूत मुस्लिम राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांना त्यांचे नेते म्हणून पाहतील अशी अपेक्षा भाजपला आहे. 

Loksabha 2024
Sharad Pawar : नागालँडमध्ये NCPच्या 7 आमदारांनी विरोध केला होता,पण...; पवारांनी सांगितलं खरं कारण

दुसरीकडे संजीव बल्यान आणि भूपेंद्र सिंह चौधरी यांच्या प्रभावाखाली जाट मुस्लिम भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात जाट, राजपूत, गुर्जर आणि त्यागी समाजातील हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतात. आपण एका देशाचे लोक आहोत, आपला डीएनए एक आहे, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वांनी मिळून देशाला पुढे न्यायचे आहे, असे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कुंवर बासित यांनी सांगितले.

भाजपने अल्पसंख्याकांना पक्षाशी जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. भाजपने राष्ट्रीय पातळीवर १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ६० लोकसभा मतदारसंघांच्या शोध घेतला आहे. या ठिकाणी धार्मिक अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. अल्पसंख्याकांवर मोठा प्रभाव पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करण्यासाठी दिल्लीत एक जाहीर सभा देखील होणार आहे. 

Loksabha 2024
BJP MP : पोलिसांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाणीत कपडे फाटले; भाजप खासदाराचा आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com