मुंबई - आदिवासी विद्यार्थ्यांना इतर समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिकवले जाते. यात अनेक शाळांची कामगिरी चांगली असली तरी यापैकी काही ठराविक शाळांच्या सुमार दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत या शाळांपैकी चार शाळांच्या निकालामुळे नामांकित शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.