esakal | बगलबच्यांमुळे पंतप्रधान मोदी सोलापुरात बदनाम
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh kothe

पालकमंत्र्यांना भेटलो, पवारांनाही भेटू 
निधी वाटपात झालेल्या अन्ययाबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आपण 15 ऑगस्टला भेटलो आहे. या यादीला मंजुरी न देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व आयुक्त यांना दिले आहेत. भाजपने सोलापूर शहराला फसवण्याचे काम केले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची सत्ता असताना या तीन पक्षाच्या नगरसेवकांना निधी नाही. आवश्‍यकता भासल्यास आपण या प्रश्‍नावर मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले.  

बगलबच्यांमुळे पंतप्रधान मोदी सोलापुरात बदनाम

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश सुधरायला निघाले आहेत. सोलापुरातील त्यांचे बगलबच्चे मात्र त्यांना बदनाम करत आहेत. अधिकाऱ्यांना दम देणे, टेंडर घेणे, टेंडरची बिले काढण्याचे काम करणारी गोल्डन गॅंग सोलापुरातील भाजपमध्ये तयार झाल्याचा आरोप सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते महेश कोठे यांनी आज पत्रकार परिषदेतून केल आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कोठे यांनी सोलापुरातील भाजपवर तोंडसुख घेतले. राज्यातील भाजपने व केंद्रातील भाजपने काय करावे? याचा सल्लाच त्यांनी दिला. 

महापालिकेच्या 2019-20 च्या अर्थसंकल्पात 13 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला होता. भाजपच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सगळ्या नगरसेवकांना प्रत्येकी 15 लाखांची कामे सूचवा म्हणून पत्र पाठवले होते. भाजपच्या सभागृहनेत्यांनी महापौरांच्या पत्राला केराची टोपली दाखवत भाजपव्यतीरिक्त इतर कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाला एकही रूपया निधी दिला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते कोठे यांनी केला आहे. निधी वाटपात भाजपने सर्वपक्षीय नगरसेवकांची फसवणूक केली आहे. सर्व गटनेत्यांना भाजपन सांगितले तुम्हाला निधी दिला आहे. पहिल्या 13 कोटीमध्ये फक्त भाजपच्याच नगरसेवकांची नावे आहेत. उर्वरित 10 कोटीमध्ये इतर सर्वांची नावे आहेत.

घनकचरा टेंडरमध्ये जुन्यापेक्षा नव्या टेंडर धारकाचे दर कमी आहेत. असे असताना देखील भाजपवाले जुन्याचा आग्रह धरून गेले चार महिने होउनही नव्या टेंडरधारकाला ऑर्डर देण्यास विरोध करत असल्याचे सांगत भाजप सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे सोलापुरातील नेत्यांनी ते सिध्द करून दाखवलय. भाजपचे नगरसेवक सगळे ठेके घेतात, कामाची गुणवत्ता घसरली आहे. अधिकाऱ्यांना दम देवून बिले काढता, भाजपच्या नावावर जगणारे लोक भाजपलाच खडडयात घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.