PM Modi Pune Visit: पंतप्रधानांची तिसरी पुणेवारी! या ३ कारणांमुळे मोदींचा दौरा ठरणार भाजपसाठी मास्टरस्ट्रोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर! पवारांच्या उपस्थितीत स्वीकारणार लोकमान्य टिळक पुरस्कार
PM Modi Pune Visit
PM Modi Pune VisitEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवारी, 1 ऑगस्ट 2023) रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार आहे. शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्याच्या राजकारणात या कार्यक्रमावरून चांगलंच राजकारण तापलं होतं. तर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या या कार्यक्रमाला जाण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

असं असेल दौऱ्याच स्वरूप

आज पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

PM Modi Pune Visit
Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती! पुन्हा कधी मुसळधार जाणून घ्या हवामानाचा विभागाचा अंदाज

मोदा आणि पवार तब्बल ८ वर्षांनी एकाच व्यासपीठावर

गेल्या सुमारे दोन महिन्यांतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेते जाहीर कार्यक्रमात प्रथमच एका व्यासपीठावर येतील. त्यामुळे या सोहळ्याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

तर मोदी आणि शरद पवार याआधी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी बारामतीमधील कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्त झाले होते. त्यानंतर असा योग येत आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुण्याचा तिसरा दौरा आहे.

PM Modi Pune Visit
Jaipur-Mumbai Exp Firing: "फक्त मोदी अन् योगीच..", एक्सप्रेसमध्ये गोळीबार केल्यावर कॉन्स्टेबलने घेतले ठाकरेंचेही नाव, Video Viral

मोदीच्या या दौऱ्याचा प्रभाव

मोदी आज विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. पुणेकरांच्या दृष्टीने सध्या मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे. मध्यमवर्गीयांना ही सुखावणारी गोष्ट आहे. या सर्व गोष्टींचा फायदा आगामी निवडणुकीत भाजपला होऊ शकतो.

पुण्यात भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा पेठेतील पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता. पुण्यात भाजप मागे पडलं आहे. पुण्यात आता महाविकास आघाडी आपले वर्चस्व स्थापन करताना दिसत आहे. याचा मोठा फटका सर्वच आगामी निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

PM Modi Pune Visit
Video Viral: आजीने खिडकी उघडली अन् काळाने घातला घाला; वृध्द महिलेचा करुण अंत, पाहा नेमकं काय घडलं?

येत्या काही दिवसांमध्ये पुणे महानगर पालिका, चिंचवड महानगरपालिका निवडणूक येत आहेत.त्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ येतात. यात पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ अशा चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. आगामी निवडणुकात मोदींच्या दौऱ्याचा प्रभाव दिसु शकतो.

तर पोटनिवडणुकीमध्ये पुणे शहरात ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर कसबा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेले अपयश याचा मोठा फटका भाजपा बसला आहे. आगामी पोटनिवडणुकीमध्ये या गोष्टी टाळण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या काही दिवसापुर्वी काही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये धीरज घाटेला पुणे शहर अध्यक्ष पद देण्यात आलं आहे. अशातच मोदींचा दौरा हे समीकरण चर्चेचा विषय ठरलं आहे.

PM Modi Pune Visit
12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी राज्य सरकारला 21 तारखेला मत स्पष्ट करण्याचे निर्देश

त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात काही दिवसांपुर्वी मोठा भुकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक ८ समर्थक आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार आणि इतर नेते पहिल्यादांच एकाच व्यासपीठावर असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहे असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो.

तर गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेचे समोर आलेले सर्व्हे यातून भाजपची पिछेहाट असू शकते. त्यामुळे देखील मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे. पुण्यात महविकास आघाडी मजबूत होत आहे. भाजपला पुन्हा पुण्यात आपली पकड मजबुत करण्यासाठी देखील हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान मोदी मोठ्या घोषणा करण्याची देखील दाट शक्यता आहे.

PM Modi Pune Visit
Samruddhi Accident: समृद्धीवर काळरात्र ! ग्रेडर मशिन कोसळून १५ जणांचा मृत्यू, बचावकार्यासाठी NDRF दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com