Maharashtra Politics: राज्यात पुन्हा खळबळ; फडणवीसांची ठाकरेंवरील टीका पृथ्वीराज चव्हाणांनी लाईक केली

राष्ट्रवादीनंतर काँग्रेसफुटीची चर्चा
Maharashtra Politics
Maharashtra Politics

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्यांचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. (Prithviraj Chavan liked Fadnavis tweet criticizing Thackeray )

भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

उद्धव ठाकरे , कोण होतास तू , काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू …अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती.

दरम्यान, सत्ताधारांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेता चव्हाण यांनी कंबोज यांच्या या ट्विटला लाईक केले आहे.

Maharashtra Politics
Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; काय आहे प्रकरण?

त्यांची ही भूमिका पाहता राष्ट्रवादीनंतर काँग्रेसफुटीची चर्चा अधिक रंगली आहे.

Maharashtra Politics
Ajit Pawar: चैत्राच्या ‘वणव्या’त अजितदादांचा कथित ‘जलवा’

कोण होतास तू काय झालास तू…फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात जोरदार हल्लाबोल केला. “तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने लेख छापला. म्हणाले, स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, सावकरांनी बलात्कार केला होता, इतकं भयानक लिहिलं होतं.

पण यांना खुर्चीची चिंता होती. साधा निषेध सुद्धा केला नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यासोबत पायी चालत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू…”, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला.

Maharashtra Politics
LIVE Marathi News Updates : ..अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या 'बीआरएस'च्या सभेला परवानगी

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस...

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com