काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यावर महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानंतर काँग्रस प्रदेशाध्यक्षपदाची त्यांच्यावर असलेली जबाबदारी ही कमी करण्याच्या विचारात पक्षश्रेष्ठी असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार या चर्चांना वेग आला असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे अत्यंत निकटवर्तीय असून त्यांच्यावरच पक्षश्रेष्ठींकडून ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात सामील होऊ नये अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा असतानाही अशोक चव्हाण हे मंत्रिमंडळात सामील झाले. परंतु पृथ्वीराज चव्हाण हे मंत्रिमंडळात सामील झालेले नाहीत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, ते पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रीही राहिले आहेत.

ठाकरे आडनाव नसतं, तर राज ठाकरे...; 'या' मंत्र्यांने केली टीका

तत्पूर्वी, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून या मंत्रिमंडळात शिवसेना आणि राष्ट्रावादीसोबतच काँग्रेसच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. काँग्रेसच्या अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, के सी पाडवी, विश्वजीत कदम, सतेज पाटील आदी नेत्यांनी मंत्रिपदी शपथ घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Chavan likely to be elected as Congress State President