Prithviraj Chavan Latest News: पृथ्वीराज चव्हाण राज्यातच राहणार? पक्षश्रेष्ठींची नाराजी दूर करण्यामध्ये अपयश आल्याचे स्पष्ट

काही काळ पुन्हा राज्याच्या राजकारणातच राहावे असा सल्ला पक्षश्रेष्ठीने दिल्याच्या चर्चा
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanEsakal
Updated on

Congress Update : काँग्रेसच्या कार्यकारी समितीमध्ये (सीडब्ल्यूसी) स्थान मिळविण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अपयश आले. त्यांच्या काही वक्तव्याने पक्षश्रेष्ठींची झालेली खपामर्जी दूर करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना यश आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही काळ पुन्हा राज्याच्या राजकारणातच राहावे, असा सल्ला पक्षश्रेष्ठीने दिल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या सीडब्ल्यूसीची घोषणा रविवारी झाली. यात महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांना ३९ सदस्यीय सीडब्ल्यूसीमध्ये स्थान मिळाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील राजकारण करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.

Prithviraj Chavan
Devendra Fadanvis: धनंजय मुंडेंच्या भेटीआधीच फडणवीसांचा जपानमधून मास्टरस्ट्रोक! कांदा प्रश्नी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची गेल्या काही महिन्यात भेटी घेतल्या. तरीही त्यांना समितीमध्ये स्थान मिळू शकले नाही. यामागे काही कारणे सांगितले जात आहे. यात पहिले म्हणजे जी-२३ गटाचे ते सक्रिय सदस्य होते.

त्यांनी भारत जोडो यात्रेबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ही नाराजी त्यांना बरीच अडचणीची ठरत आहे. जी-२३ मधील आनंद शर्मा, मुकुल वासनिक, मनीष तिवारी यांना मात्र संधी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घालावे, असे पक्षाने संकेत दिल्याचे दिसून येत आहे.

Prithviraj Chavan
तीन पक्षाचं रूपांतर विदर्भातील खड्या तमाश्यात, कोणी नाच्या...; वडेट्टीवारांची सरकारवर जहरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karad Krishna Sugar Factory election latest updates
Ashok Chavan
Pune TDR Dispute Sparks Reaction as Actress Usha Chavan Returns Honour
Citizens Demand Unveiling of Yashwantrao Statue on Maharashtra Day
Marathi News Esakal
www.esakal.com