खासगी विमान कंपन्यांकडून आता प्रवाशांना 'ही' विशेष ऑफर; स्पाईस जेटची महत्वाची घोषणा..

प्रशांत कांबळे 
Thursday, 9 July 2020

कोरोना काळात विमान प्रवास करतांना नागरिकांमध्ये भिती असल्याने, विमान सेवा कोलमडल्या आहे. त्यामूळे खासगी विमान कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे.

मुंबई: कोरोना काळात विमान प्रवास करतांना नागरिकांमध्ये भिती असल्याने, विमान सेवा कोलमडल्या आहे. त्यामूळे खासगी विमान कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षीत प्रवास आणि प्रवाशांना आकर्षीत करण्यासाठी या विमान कंपन्यांनी विम्याची घोषणा केली आहे. स्पाईस जेट या विमान कंपनीने 3 लाख रूपयांच्या विमान कंपनीची घोषणा केली आहे. 

हेही वाचा: बापरे! शववाहीनीचे दोन महिन्याचे भाडे तब्बल 'इतके' लाख रुपये; वाचा सविस्तर बातमी.

विमान प्रवास अधिक सुरक्षीत करण्यासाठी खासगी विमान कंपन्यांनी कोविड विमा योजनेची घोषणा केली आहे. विमान प्रवासानंतर 15 दिवसांमध्ये प्रवाशांना कोविड-19 ची लक्षण असल्यास त्यांना या विम्याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये सर्वात कमी आणि सर्वाज जास्त रूपयांचे प्रिमीयम देण्यात आले आहे. त्यामूळे तिकीट बुकिंग करतांनाच प्रवाशांना दोन विम्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. 

प्रवासी विमान प्रवास कोरोनाच्या भितीमूळे टाळत असल्याचे नुकतेच एका खासगी कंपनीच्या सर्व्हक्षणात उघड झाले होते. काहींनी एक महिन्यानंतर तर अनेकांनी सहा महिन्यांपर्यंत विमान प्रवास करणार नसल्याचे प्रवाशांचे मत या सर्व्हेक्षणातून उघड झाले होते. त्यामूळे प्रवाशांच्या मनातून कोरोनाची भिती घालवण्यासाठी आता विमान कंपन्या हा मार्ग वापरत असल्याचे दिसून येत आहे. 

त्यामूळे प्रवाशांचा सुरक्षीत प्रवास होणार असून, त्यांना विमान प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्या उपचाराची हमी दिल्यास प्रवासी संख्या वाढणार असल्याचे या खासगी विमान कंपन्यांनी दावा केला आहे. 

हेही वाचा: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'हे' काम करणं आवश्यक; हायकोर्टमध्ये याचिका दाखल..

सर्वात कमी 443 रुपयांचे प्रीमियम: 

अनेक प्रवासी खर्च जास्त असल्याने उचलू शकत नाही. मात्र, आता तिकीट बुकिंग करतांनाच विम्याचे पैसे आधीच भरावे लागणार आहे. यामध्ये 443 रूपयाचा विमा काढल्यानंतर प्रवासा दरम्यान कोरोनाची बाधा झाल्यास 50 हजार रूपयांपर्यंतचा खर्च कंपनी करणार आहे. तर सर्वात महाग पिमीयम 1564 रूपयांचा आहे. ज्यामध्ये तिन लाख रूपयांपर्यंतचा खर्च कंपनी करणार आहे.

संपादन: अथर्व महांकाळ 

private airlines are giving special offers 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private airlines are giving special offers