कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'हे' काम करणं आवश्यक; हायकोर्टमध्ये याचिका दाखल..

mumbai high court
mumbai high court

मुंबई : राज्यात उसळलेली कोविड19 ची साखळी तोडायची असेल तर कोरोना बाधित रुग्णांची नावे जाहीर करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

रुग्णांचा गोपनीयतेचा अधिकार कि नागरिकांचे आरोग्य यामध्ये सरकारने नागरिकांच्या हिताचा विचार करायला हवा, असेही याचिकेत सुचविण्यात आले आहे.

मुंबईसह सर्व जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. ही साखळी तातडीने मोडून काढणे आवश्यक आहे, त्यासाठी अशा रुग्णांच्या संपर्कात येणे नागरिकांनी टाळणे गरजेचे आहे, असे सांगणारी जनहित याचिका न्यायालयात करण्यात आली आहे

.रायगडमधील वैष्णवी घोलवे आणि सोलापूरमधील महेश गाडेकर यांनी एड विनोद सांगवीकर यांच्या मार्फत केली आहे. प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेचा (राईट औफ प्रायव्हसी) अधिकार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आरोग्याचाही मूलभूत अधिकार आहे. मात्र कोरोना साथीमध्ये हे दोन्ही अधिकार एकमेकांना छेद देत आहेत असे याचिकादारांचे म्हणणे आहे.

कोरोना रुग्णांचे नाव आणि छायाचित्र जाहीर केले जात नाही, मात्र त्यांच्या राहण्याचा परिसर जाहीर केला जातो. जर त्यांची नावे ही जाहीर केली तर त्यांच्या संपर्कात आजाराच्या दरम्यान आलेले नागरिक, शेजारी, नातेवाईक सतर्क होऊन स्वतः ची देखभाल अधिक काटेकोरपणे करू शकतील.

त्यामुळे कोरोनाची वाढती साखळी तोडणे शक्य होईल, असे याचिकादार म्हणतात. माणुसकी म्हणून आणि त्यांना नकारात्मक वागणूक मिळू नये म्हणून त्यांची नाव जाहीर केली जात नसली तरी सध्या सोशल डिस्टन्सिंग असल्याने असेही सर्व एकमेकांपासून दूर आहेत. त्यामुळे केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून अशा रुग्णांची नावे जाहीर करण्याची तरतूद केन्द्र, राज्य सरकार आणि प्रशासन, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

लक्षणे नसलेल्या कोरोनावाहकांचे प्रमाण आता साठ टक्केहून अधिक झाले असून धोकादायक परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे कोरोनाचा आकडा वाढण्याआधी नागरिकांना सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

राजकीय नेते, मंत्री, सेलिब्रिटी त्यांना कोरोना बाधा झाली कि स्वतःहून जाहीर करतात, त्याप्रमाणे कोरोना रुग्णांची नावे सार्वजनिक संकेत स्थळ, समाज माध्यम, प्रसिद्धीमाध्यमे आदी द्वारे उघड करावी, म्हणजे धोका कमी होऊ शकतो, असा दावा याचिकादारांनी केला आहे.

संपादन: अथर्व महांकाळ 

declare list of corona patients for braking chain of virus 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com