
अजित देसाई, सिन्नर: सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास पाथरे गावाजवळ खाजगी आराम बस आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण मयत झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.